29 June 2022 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

बहुजन समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी फडणवीसांनीच संभाजीराजेंना अपक्ष लढायला सांगितलं | शाहू महाराजांनी बिंग फोडलं

Shahu Maharaj

संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या मैदानात उडी घेतल्यानंतर त्यांनी अखेर माघारही घेतली. मात्र आता छत्रपती घराण्यातून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल झाली आहे. स्वतः शाहू महाराजांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण विषयावर भाष्य केल्याने सत्य समोर आलं आहे. तसेच शाहू महाराजांनी अप्रत्यक्षरीत्या संभाजी महाराज यांचे देखील कुटुंबिक पातळीवर कां टोचले आहेत.

ती खेळी फडणवीस यांचीच आणि संभाजीराजेंचा राजकीय घात :
संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती महाजांनी केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं :
संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला असं म्हणता येत नाही. कारण ही पूर्णपणे राजकीय भूमिका होती. संभाजीराजेंनी अपक्ष उभं राहावं ही भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांची खेळी होती. त्यांनीच त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास भाग पाडलं होतं, असं शाहू छत्रपती यांनी सांगितलं.

बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव :
संभाजी छत्रपती यांनी जानेवारीपासूनच राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू केले होते. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, असं सांगतानाच बहुजन समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच भाजपनं संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची खेळी केली, असा दावा शाहू छत्रपती यांनी केला.

माध्यमांच्या आडून लक्ष केले शिवसेनेला :
शाहू महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. खेळी फडणवीसांनी केली मात्र यामध्ये शिवसेना कशी लक्ष होईल यांची ठराविक माध्यमांमार्फत काळजी घेतली असं देखील समोर येतंय. चार प्रमुख पक्षांमध्ये केवळ शिवसेना याप्रकरणात माध्यमांच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी भाजपचं राजकारण समोर आले आहे आणि ते छत्रपती घराण्याकडूनच समोर आणण्यात आलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा अपमान नेमका कोणी केला ते देखील सिद्ध झालं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shahu Maharaj talked on Sambhajiraje Rajysabha Election Contest check details here 28 May 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(694)#Sambhajiraje(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x