16 August 2022 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 ऑगस्ट, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा Investment Schemes | सर्वात जास्त परतावा आणि टॅक्स बचत करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या?, नफ्याच्या योजनांची माहिती जाणून घ्या PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Horoscope Today | 17 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
x

Shivsena Hijacked | शिंदेना हाताशी धरून गुजरातमध्ये हा धक्कादायक प्रकार घडतोय | फडणवीस सुद्धा हजर

Shivsena Hijacked

Shivsena Hijacked | शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

फडणवीस अहमदाबादला रवाना :
दुसऱ्याबाजूला राज्यातील राजकीय घडामोडींबाबत दिल्लीतही मोठ्या हालचाली घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले आणि त्यानंतर लगेचच अहमदाबादला रवाना झाले आहेत. लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.

शिवसेना हायजॅक करण्यासाठी अजब प्रस्ताव :
१. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव बनवून शिंदेंना दिल्याचं म्हटलं जातंय. त्यात प्रथम एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाचं गाजर देण्यात आलं आहे.
२. प्रस्ताव मान्य केला तरी फडणवीस मुख्यमंत्री होतील किंवा जर मान्य केला नाही तरी फुटलेल्या आमदारांच्या समर्थनातून फडणवीस मुख्यमंत्री होतील.
३. हा प्रकार असा की, ‘सेनेकडून बोलणी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींनी प्रस्ताव मान्य न केल्यास आमदारांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात ठेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या वेळी विशेष केंद्रीय सुरक्षेत राज्यात आणलं जाईल अशी योजना आहे. हा प्रकार राजकीय दृष्ट्या अत्यंत भीषण आहे.
४. आता राज्य सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल असे संकेत मिळाले आहे.
५. राज्यातून ते सुरतपर्यंत पूर्ण फिल्डिंग लावून या आमदारांना अप्रत्यक्षरीत्या शिंदेंच्या आडून हायजॅक केलं गेल्याचं म्हटलं जातंय.
६. उद्धव ठाकरेंना जबरदस्तीने स्वतःसोबत घेण्याचा, अन्यथा राजकीय दृष्ट्या संपविण्याची अत्यंत क्रूर राजकीय खेळी महिन्यापूर्वीच आखली गेली होती असं म्हटलं जातंय.
७. हॉटेलच्या बाहेरील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून येथे शहर पोलीस, राज्य राखीव दल आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी बसवून टोकाची काळजी घेण्यात आली आहे.

गुजरात भाजपचे अध्यक्ष संपर्कात :
शिंदे आणि इतर ‘बंडखोर’ आमदार गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या संपर्कात आहेत. सुरतला पोहोचल्यानंतर अनेक आमदारांनी पाटील यांची भेटही घेतली होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षही सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Hijacked by Eknath Shinde check details here 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Hijacked(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x