26 April 2024 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ITBP Bus Accident | काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 7 जवान शहीद, 6 जण गंभीर

ITBP Bus Accident

ITBP Bus Accident | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा अपघात झाला आहे. आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी परिसरात दरीत कोसळली. या अपघातात 7 जवान शहीद झाले असून यात 6 आयटीबीपी आणि 1 पोलीस कर्मचारी आहे. तर 32 जवान जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी जवानांना श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये 39 सैनिक होते. त्यामध्ये आयटीबीपीचे ३७ जवान आणि जम्मू-काश्मीरचे २ पोलिस कर्मचारी होते. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

यात 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला :
आयटीबीपीच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा नंतर मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. यात बळी गेलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना घेऊन जाण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

अमरनाथ यात्रा ड्यूटीवरून परतताना अपघात :
बसमधील जवान अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून परतत होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बचावकार्याला गती देण्यासाठी आयटीबीपीचे कमांडो घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळून 18 जण जखमी झाले होते. बसमधील बहुतेक प्रवासी विद्यार्थी होते. ही मिनी बस बर्मिनहून उधमपूरकडे जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि घोरडी गावाजवळ बस दरीत कोसळली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 11 विद्यार्थ्यांसह 18 जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ITBP Bus Accident VIDEO Jammu Kashmir Pahalgam many Jawan Shahid check details 16 August 2022.

हॅशटॅग्स

#ITBP Bus Accident(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x