13 December 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

TRP घोटाळा | लाखोंची लाच देऊन TRP वाढवला | मुंबई हायकोर्टात अहवाल सादर

Republic TV, BARC CEO Partho Dasgupta, Arnab Goswami

मुंबई, २९ डिसेंबर: TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई हायकोर्टात अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) ) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी हायकोर्टात केला आहे. (Republic TV in danger zone after arrest of former BARC CEO Partho Dasgupta)

पार्थो दासगुप्ता बीएआरसीचे सीईओ असतानाच्या काळात अर्णव गोस्वामी आणि इतर आरोपींनी रिपब्लिक भारत हिंदी वृत्तवाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी वृत्तवाहिनीच्या टीआरपीत चुकीच्या पद्धतीनं वाढ करण्यात आली. TRP वाढवून दाखविण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना अनेकदा लाखो रुपयांची लाच दिली, असं चौकशीत समोर आलं आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली. (Goswami often bribed Dasgupta with millions of rupees to increase his TRP)

पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. (Mumbai Police has for the first time openly named Arnav Goswami in the TRP scam)

परंतु पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालात आरोपी म्हणून अर्णव गोस्वामी यांचं नाव नमूद केलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिककडून मिळालेल्या पैशातून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या आहेत. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १ लाख रुपये किमतीचं घड्याळ आणि इमिटेशन ज्वेलरीसह २.२२ लाख किमतीचे काही मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला होता आणि त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला गेला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला होता. लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाल्याने दंड ठोठावण्यात आला होता.

कारण ठरलं होतं ६ डिसेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेलं लाईव्ह डिबेट. संबंधित कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून कारवाईची माहिती देत सांगण्यात आलं होतं की, “ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं आणि पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या होत्या”.

 

News English Summary: Mumbai Police on Monday filed a report in the Mumbai High Court in connection with the TRP scam. Arnav Goswami, editor of Republic Television Network, has allegedly paid millions of rupees to Partho Dasgupta, former CEO of Broadcast Audience Research Council (BARC), to raise his television rating point (TRP).

News English Title: Republic TV in danger zone after arrest of former BARC CEO Partho Dasgupta news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x