5 February 2023 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे?
x

भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा | वेळ आली आहे मोदी सरकार पाडा आणि पळवा

TMC leader Mahua Moitra, Modi government, farmers protest

नवी दिल्ली, ४ जानेवारी: केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकीकडे तंबूंमध्ये भरलेले पाणी, भिजलेली ब्लँकेट्स अन् भिजलेली जळावू लाकडे ही स्थिती होती दिल्लीच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत गेल्या महिनाभराहून अधिक कालावधी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कॅम्पमधली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या आंदोलक शेतकऱ्यांची दैना उडाली. पण, तरीही थंडी-पावसाचा सामना करीत हे शेतकरी निधड्या छातीने दिल्लीच्या सीमा अडवून उभे आहेत.

30 डिसेंबर रोजी झालेल्या सहाव्या फेरीच्या चर्चेदरम्यान आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चार पैकी दोन विषयांवर सहमती झाली. प्रस्तावित वीज कायदा, पेंढा जाळण्याशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. मात्र, अद्याप दोन मुख्य मागण्यांवर शेतकरी कायम आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यावर तसेच किमान हमीभावाला कायद्याचे स्वरुप देण्यावर चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारला याच विषयाला अनुसरून लक्ष केलं आहे. या संदर्भात ट्विट करताना महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे की, “भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा, आता वेळ आली आहे की मोदी सरकार पाडा आणि पळवा…

 

News English Summary: The agitation of farmers against the agriculture law implemented by the Center continues despite the severe cold and unseasonal rains. Meanwhile, another meeting was held between the central government and the farmers’ association today. This is the seventh meeting between the agitating farmers and the government. Therefore, it is expected that the problems of the farmers will be solved even today.

News English Title: TMC leader Mahua Moitra criticised Modi government over farmers protest issue news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x