2 May 2025 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Twitter Report | पत्रकार, मीडिया संस्थांच्या ट्विटवर सरकारची बारीक नजर?, जगात असे ट्विट हटवण्यात भारत आघाडीवर - रिपोर्ट

Twitter Report India

Twitter Report | पत्रकार आणि मीडिया संस्थांनी केलेले ट्विट काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. ट्विटरने नुकत्याच दिलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जुलै ते डिसेंबर 2021 या कालावधीत मान्यताप्राप्त पत्रकार आणि मीडिया संस्थांकडून ट्विट काढून टाकण्यासाठी ट्विटरला प्राप्त झालेल्या सर्व कायदेशीर विनंत्यांमध्ये भारताचा वाटा सर्वात मोठा आहे.

पारदर्शकतेच्या अहवालानुसार :
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पारदर्शकतेच्या अहवालानुसार, ट्विटर अकाउंट्सशी संबंधित माहिती विचारण्याच्या बाबतीत भारत केवळ अमेरिकेपेक्षा मागे राहिला. ट्विटरकडून मागवलेल्या अशा माहितीत भारताचा वाटा जगाच्या 19 टक्के इतका होता. या अहवालानुसार, जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यान सर्व प्रकारच्या युजर्सच्या कंटेंटवर बंदी घालण्यासाठी जारी करण्यात आलेल्या एकूण आदेशांच्या संख्येच्या बाबतीत भारत पहिल्या 5 देशांमध्ये देखील आहे.

पत्रकार-मीडिया संस्थांच्या 349 ट्विटर अकाऊंटवरील कंटेंट :
ट्विटरच्या रिपोर्टनुसार, जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान जगभरातील व्हेरिफाइड पत्रकार आणि मीडिया संस्थांच्या 349 ट्विटर अकाऊंटवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी कायदेशीर विनंत्या आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत प्राप्त झालेल्या अशाच प्रकारच्या कायदेशीर विनंतीपेक्षा ही संख्या १०३ टक्क्यांनी अधिक आहे.

सर्वात मोठा वाटा भारताचा :
ट्विटरच्या अहवालात म्हटले आहे की, या वाढीमध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो भारत, तुर्की, रशिया आणि पाकिस्तान या देशांनी घेतलेल्या कायदेशीर आक्षेपांचा. भारताने ११४, तुर्कीने ७८, रशियाने ५५ आणि पाकिस्तानने ४८ कायदेशीर आक्षेप नोंदवले आहेत.

कायदेशीर आक्षेपांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर :
यापूर्वी जानेवारी ते जून 2021 या कालावधीत दाखल झालेल्या कायदेशीर आक्षेपांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. त्या काळात ट्विटरला भारताकडून अशा प्रकारच्या ८९ कायदेशीर विनंत्या किंवा मागण्या आल्या होत्या. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, या “कायदेशीर मागण्यांमध्ये” सरकारी विभाग किंवा अधिकाऱ्यांकडून सामग्री आणि सूचना काढून टाकण्याचे न्यायालयाचे आदेश समाविष्ट आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Twitter Report India globally on Tops in seeking removal of journalists Twitter Posts says Report 29 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Twitter Report India(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या