11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Video Viral | साहेब याला आवरा, हा दुसरा नारायण राणे होणार | अनंत तरे यांनी केली होती भविष्यवाणी | आज सत्य ठरली

Video Viral

Eknath Shinde | सध्या देशभर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या राजकीय बंडाची चर्चा सुरु आहे. पण त्यानंतर आता ठाण्यातील एका नेत्याने जे आता हयातीत नाहीत, म्हणजे अनंत तरे यांनी एक भाकीत केले होते आणि ते आज सत्यात उतरले आहेत. त्यांनी हा इशारा थेट नाव घेत उद्धव ठाकरे यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.

शिवसेनेचे माजी आमदार :
शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे फेब्रुवारी २०२१ मध्ये निधन झाले. ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. विधान परिषदेवर अनंत तरे २००० ते २००६ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत होते. याआधी तरे ठाणे शहराचे महापौर होते.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान :
अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले होते. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले.

राजकीय भाकीत केले होते :
ठाणे शहराचे महापौर पद तीन वेळा भूषवण्याचा मान अनंत तरे यांना मिळाला होता. ते एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. ठाण्यात महापौर पदाची हॅटट्रिक साधणारे ते एकमेव नेते होते. विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांचा पराभव करुन ते आमदार झाले होते. पण २०१४च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. या मुद्यावरुन ते नाराज झाले होते. मात्र त्यावेळी त्यांनी एक गंभीर इशारा आणि माहिती उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजकीय अनुभवातून दिली होती. तोच इशारा आज सत्य ठरला आहे. पहा खालील व्हिडिओमध्ये की स्व. अनंत तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय राजकीय भाकीत केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral Anant Tare alert on Eknath Shinde check details 23 June 2022.

हॅशटॅग्स

#Anant Tare(1)#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x