5 June 2023 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या
x

VIDEO | जेव्हा गुजरातचे भाजप नेते आणि अधिकारी CBI चौकशांमध्ये अडकलेले आणि मोदी CBI वर संतापलेले | हा व्हिडिओ पहा

PM Narendra Modi

मुंबई, 12 मार्च | पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी सीबीआयविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.

त्यावेळी भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी ED, CBI अशा केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर सडकून टीका केली होती. त्याचाही मोदींनी समाचार घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीती नेत्यांविरोधात ज्या कारवाई सुरू आहेत, त्या भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात येत आहे.

लोकांच्या मनात अशा भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक प्रकारचा राग आहे. भाजप 2014 मध्ये एक इमानदार सरकारचं आश्वासन देत निवडणूक लढवली. 2019 ला पुन्हा आम्हाला जनतेनं सत्तेत बसवलं. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही भ्रष्टाचार संपवावा. पण आज आम्ही पाहतो की ज्या निष्पक्ष संस्था आहेत, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात, तर हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. असा आरोप यावेळी मोदींनी केला.

मात्र पंतप्रधान मोदींना सांगितलेल्या याच निष्पक्ष संस्थांच्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाईत गुजरातमध्ये अनेक राजकीय नेते आणि अधिकारी अडकले तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच निष्पक्ष संस्थांच्या भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईवर आक्षेप घेत CBI वर प्रचंड टीका केली होती. त्यामुळे मोदींनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यामंधील याच संस्थांमधील कारवाई संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका किती दुप्पटी आहे ते स्पष्ट होते. त्याचा पुरावा देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: When Gujarat BJP leaders and officials were under CBI investigation.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1663)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x