15 December 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Viral Video | अजब शिक्षिका, पावसामुळे शाळेत पाणी भरल्यावर विद्यार्थ्यांकडून स्वतःसाठी असा खुर्च्यांचा पूल बांधला, व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | देशाच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना ये-जा करण्यातही अडचणी येत आहेत. पाणी साचण्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो यूपीतील मथुरा येथील असल्याचं बोललं जात आहे. येथे मुसळधार पाऊस झाल्यानंतर एका शाळेबाहेर पाणी साचले होते, त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून खुर्च्यांचा पूल तयार करून तो पार करून आत गाठला.

व्हिडिओ प्रचंड व्हायरल :
हा व्हिडिओ सोशल मीडियात दिसताच व्हायरल झाला आणि त्याची दखल घेत शिक्षण विभागाने कारवाई केली आणि शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्यात आलं. हे प्रकरण मथुरा जिल्ह्यातील बलदेव डेव्हलपमेंट ब्लॉकमधील दागेंटा १ या प्राथमिक शाळेशी संबंधित आहे, जिथे पावसानंतर पाणी गेले आणि यामुळे शाळेचा मार्ग बंद झाला. यानंतर शिक्षिका पल्लवी श्रोत्रिया यांनी पाण्यातून बाहेर पडण्याचा अनोखा मार्ग काढत विद्यार्थ्यांकडून खुर्च्या मागवल्या आणि पाण्यावर पूल बांधून ते पार करून शाळेत प्रवेश केला.

माफी मागितली :
शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिक्षण विभागाने तातडीने कारवाई केली. कार्यवाहक बेसिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पल्लवी श्रोत्रिया या शिक्षिकेला निलंबित करण्याचा आदेश काढला. याशिवाय तिने असे का केले, याचे स्पष्टीकरणही शिक्षकांकडून मागवण्यात आले आहे, त्यावर शिक्षकांनी उत्तर दिले की, डॉक्टरांनी तिला पाणी टाळण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे तिने तसे केले. याबाबत आरोपी शिक्षकाने माफीही मागितली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Mathura students created chair bridge for teacher to help her for entering in school video viral on social media 01 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x