12 December 2024 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Multibagger IPO | या आयपीओ गुंतवणूकदारांना बंपर लॉटरी लागली, 37 रुपयांच्या शेअरने 1000 टक्के परतावा दिला

Multibagger IPO

Multibagger IPO | आज आपण अशा एका बंपर आयपओ स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. स्टॉक जेव्हा मार्केट मध्ये आला होता तेव्हा तो 37 रुपये वर ट्रेड करत होता. पण मागील आठवड्यात ह्या शेअर्सनी 408 रुपयाचा टप्पा गाठला आहे. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. ही एक शिपिंग कंपनी असून त्याच्या शेअर्समध्ये गेल्या काही आठवड्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. या शेअरचा दर वार्षिक वाढ प्रमाण 170.52 टक्के आहे.

शेअर्स मधील उलाढाल :
नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सच्या शेअर्समध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 3.69 टक्के वाढ झाली होती आणि तो 407 रुपयांवर ट्रेड करत होता. ट्रेडिंग सेशन दरम्यान, हा स्टॉक 408 रुपयांपर्यंत पोहोचला होता, जो स्टॉक चा 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत आहे. गेल्या काही ट्रेडिंग सेशनपासून शिपिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 52.15 टक्के वाढला आहे. या वर्षी स्टॉक मध्ये दर वार्षिक वाढ प्रमाण 170.52 टक्के राहिला आहे.

ट्रेडिंग आणि परतावा :
नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स ह्या कंपनीचा स्टॉक गेल्या वर्षी 22 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात ट्रेडिंग साठी लिस्ट झाला होता. कंपनीने जेव्हा आपला IPO आणला होता तेव्हा त्याचे अधिग्रहण ठरलेल्या किमतीपेक्षा 37 टक्के जास्त झाले होते. हा IPO 09 मार्च 2021 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता आणि तो 12 मार्चपर्यंत सबस्क्रिप्शन साठी खुला होता. त्याची सुरवातीची किंमत 37 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती. म्हणजेच, इश्यू किमतीच्या तुलनेत हा शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 1000 टक्के अधिक वधरला आहे.

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स ही एम ग्रुप अंतर्गत ट्रेडिंग व्यापार करणारी कंपनी आहे, जी सध्या BSE SME निर्देशांकावर एम ग्रुप अंतर्गत ट्रेडिंग करत आहे. बीएसई एक्स्चेंजचे एसएमई प्लॅटफॉर्म हे उच्च वाढ क्षमता असलेल्या लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी आहे. एक्स्चेंजचे एसएमई प्लॅटफॉर्म अशा एसएमईंसाठी खुले आहे ज्यांचे इश्यू पेड-अप कॅपिटल 25 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

KMEW बद्दल सविस्तर :
नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीची स्थापना 2015 साली भारत सरकार आणि खाजगी कंपन्यांसाठी सागरी शिपिंग व्यापार मालकी आणि सगरी वाहतूक ऑपरेशनसाठी करण्यात आली होती. कंपनी विविध बंदरांवर ड्रेजिंगसह सागरी अभियांत्रिकी उपायांची सेवा देते. कंपनी नौदल आणि व्यापारी जहाजांसाठी दुरुस्ती सेवा देण्यात अग्रेसर आहे. कंपनीच्या सेवा आणि व्यापारात जहाजांच्या देखभाल आणि ऑपरेशनसाठी तांत्रिक दुरुस्ती तसे देखभाल सेवा यांचा देखील समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO Knowledge Marine and Engineering Works share price return on 1 August 2022.

हॅशटॅग्स

Mutibagger IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x