8 May 2025 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २ एप्रिल: मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे २२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता पहिल्यांदाच हा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

दुसरीकडे, मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखीच फुगत चालला आहे. आज एकाच दिवशी करोनाचे ७५१ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले असून गेल्या २४ तासांत करोनामुळे ५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२५ इतकी झाली आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 2293 new cases of corona have been detected across the country. At least 71 people have been killed. This is the largest number of patients reported in a single day. In the last few days, the number of patients in India was increasing between 1500 and 1900 every day. However, for the first time, this number has gone beyond 2000.

News English Title: 2293 new covid 19 cases 71 deaths in the last 24 hours this is the highest number of cases reported in one day News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या