22 August 2019 11:54 PM
अँप डाउनलोड

लखनऊ-दिल्ली मार्गावर भीषण अपघातात बस नाल्यात कोसळून २९ जणांचा मृत्यू

लखनऊ-दिल्ली मार्गावर भीषण अपघातात बस नाल्यात कोसळून २९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : लऊनऊ-दिल्ली मार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २९ जणांचा जागीत मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस सोमवारी सकाळी यमुना एक्सप्रेसवर नाल्यात कोसळली. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विट करून अधिकृत माहिती दिली आहे.

दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. या घटनेसंदर्भात युपी पोलिसांनी ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘अवाध बस डेपोची बस नंबर UP33 AT 5877 या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती यमुना एक्सप्रेस येथील जर्ना नाल्यात पडली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#india(58)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या