7 May 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा
x

राजकारणी सुद्धा विळख्यात; गुजरातमध्ये वरिष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

Gujarat Covid 19, Corona Crisis, congress leader Badruddin

अहमदाबाद, २७ एप्रिल: देशात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात गुजरातमध्ये एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अहमदाबाद महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले बदरुद्दीन शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शेख यांच्या निधनानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदाबाद महापालिकेचे नगरसेवक बद्रुद्दीन शेख यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर दु:ख झालं. या दु:खात काळात त्यांचे कुटुंब आणि नातेवाईंकासोबत माझ्या संवेदना आहेत’, असं ट्वीट करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १९९० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती २६ हजार ४९६ पर्यंत पोहोचली आहे. तर या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ५ हजार ८०४ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ८७२ वर पोहोचली आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २३० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ३०१ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १५१ वर पोहचला आहे.

 

News English Summary: The incidence of corona is increasing in the country and the number of patients with corona is increasing day by day. In Gujarat, a senior Congress leader has reportedly died due to corona. Badruddin Sheikh, a senior Congress leader and a Congress corporator in the Ahmedabad Municipal Corporation, has died due to corona.

News English Title: Story Gujarat state congress leader Badruddin has passed away due to covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x