3 May 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

VIDEO | कृषी कायदे | २०१५ मधील राहुल गांधींची भविष्यवाणी ठरली खरी

Advocate Prashant Bhushal, Rahul Gandhi, farmers Protest

नवी दिल्ली, ९ जानेवारी: केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली आठवी बैठकही काल निष्फळ ठरली. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.

दुसरीकडे संसदेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिलेले भाषण ज्येष्ठ विधितज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी रीट्वीट केले आहे. २०१५ मधील या भाषणात राहुल गांधी यांनी केलेली भविष्यवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खरी ठरवल्याचा हा दाखला मानला जात आहे.

राहुल गांधींचे ५ वर्षांपूर्वीचे भविष्यसूचक शब्द खरे होत आहेत. शेतीप्रधान जमीन ही उद्योगपतींकडे सुपूर्द करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना कमकुवत करीत आहेत, असे कॅप्शनमध्ये भूषण यांनी लिहिले आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलेय की, भारतातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या किंमती वेगाने वाढत आहेत. उद्योजकांना ही जमीन हवी आहे. सरकार आपण काय करीत आहात? एकीकडे शेतकरी आणि मजूर कमकुवत. अशा वेळी जेव्हा शेतकरी अशक्त होईल, जेव्हा त्याला आपल्या पायांवर उभे राहता येणार नाही. मग तुम्ही त्याच्याविरुध्द अध्यादेशाद्वारे कुऱ्हाड मारणार आहात का?

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi’s speech in Parliament has been retweeted by senior jurist Prashant Bhushan. This is considered to be the proof that the prediction made by Rahul Gandhi in this speech in 2015 has been fulfilled by the government of Prime Minister Narendra Modi.

News English Title: Advocate Prashant Bhushal twit Rahul Gandhi speech in Loksabha 2015 regarding farmers news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या