27 July 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत फटका बसणार हे लक्षात आल्यानेच कृषी कायदे रद्द - शरद पवार

Agriculture Laws are repealed

मुंबई, 19 नोव्हेंबर | पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत फटका बसणार हे ओळखून कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. उशिरा का होईना पण सरकारला शहाणपण आलं. जो संघर्ष झाला त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन्ही राज्यांमधले शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते. निवडणुकीत फटका बसू नये म्हणून हे कायदे रद्द करण्यात आल्याची प्रतिक्रिया (Agriculture laws are repealed) शरद पवारांनी दिली आहे.

Agriculture laws are repealed. NCP President Sharad Pawar has said that agriculture laws have been repealed knowing that Punjab and Uttar Pradesh elections will be affected :

ज्या शेतकऱ्यांनी संघर्ष केला त्यांना माझा सलाम आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या कायद्यांच्या संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यामध्ये अनेक मुद्दे होते. त्याबाबत सरकार विचार करत होतं. त्यावेळी कायद्यात दुरूस्ती करावी का? याविषयीही चर्चा झाली होती. कृषी हा विषय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्या त्या राज्य सरकारांना विश्वासात घेऊन राज्यांमधल्या कृषी संघटनांना विश्वासात घेऊन विचार करायला हवा होता.

केंद्र सरकारने जेव्हा कृषी कायदे आणले तेव्हा संसदेत, राज्यांशी आणि शेतकऱ्यांची चर्चा केली नव्हती. कृषी कायद्यांचा विषय असल्याने त्यावर सविस्तर चर्चाही अपेक्षित होती मात्र सत्ताधाऱ्यांनी ती होऊ दिली नाही. या कायद्यांमुळे शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार होते त्यामुळे उशिरा का होईना पण सरकारने निर्णय घेतला ते महत्त्वाचं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Agriculture Laws are repealed knowing that Punjab and Uttar Pradesh elections will be affected says Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x