22 September 2019 2:08 PM
अँप डाउनलोड

आंध्रा: ‘चलो आत्मकूर’ आंदोलनामुळे चंद्राबाबू नजरकैदेत; तर TDP कार्यकर्त्यांची धरपकड

Andhra Pradesh, Chandrababu Naidu, TDP

अमरावती: ‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. नायडू यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत गुंटूर जिल्ह्यात सरकारच्या विरोधात चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.

रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टीडीपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. टीडीपीचे नेते भूमा अखिला प्रिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, विजयवाडातील नोवोटेल हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर नंदीगामा शहरात आंदोलन करणाऱ्या टीडीपीचे माजी आमदार तंगिराला सोमया यांच्यासह कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले असून, सोमया यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना माध्यमांशी बोलण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

याचबरोबर, टीडीपीचे वरिष्ठ नेते जो अथमाकूर, माजी मंत्री पी पुल्ला राव, नक्का आनंद बाबू, अल्पपति राजा, सिद्ध राघव राव, देवीनेनी उमामहेश्वर राव, आमदार एम. गिरी, जी राममोहन, माजी आमदार बोंडा उमा, वायव्हीबी राजेंद्र प्रसाद आणि देवीनेनी यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात संचारबंदी लागू केली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या