17 November 2019 9:28 PM
अँप डाउनलोड

राम जन्मभूमी वादाचा युक्तीवाद पूर्ण; २३ दिवसांमध्ये येणार निकाल

Ayodhya, Ram Mandir, Supreme Court of India

नवी दिल्लीः अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला असून तो २३ दिवसानंतर म्हणजेच येत्या १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.

हिंदू महासभेने न्यायालयात राम जन्मभूमीचा नकाशा दाखवला होता. पंरतु मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी तो नकाशा फाडल्याची माहिती समोर आली होती. ‘मला ती पानं दूर फेकायची होती. परंतु मुख्य न्यायाधीशांनी ती पान फाडण्यास सांगितलं. त्यानंतर ती पानं फाडली’ असल्याचं स्पष्टीकरण धवन यांनी दिलं.दिवाळीमध्ये रामजन्मभूमीच्या जागी प्रार्थना, पूजा अर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे हिंदू संतांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेतेही विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांना भेटले असून त्यांनी हिंदू संतांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. हिंदूंना अशी परवानगी दिली तर आम्ही पण तिथं नमाज पढू असा इशारा बाबरी कृती समितीनं दिला आहे.

राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीकडे पाहता उत्तर प्रदेश सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्ती पूर्वी याप्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. जागेच्या मालकिविषयी वाद असलाच तर शिया व सुन्नी वक्फ बोर्डामध्ये असायला हवा, पण या प्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाचा ताही संबंधच नसल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाच्या वकिलांनी केला आहे. हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या युक्तीवादानंतर शियांच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला.

मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलानं नकाशा फाडताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही अशा प्रकारे सुनावणी सुरू ठेवू शकत नाही. लोक कधीही उभे राहून बोलू लागतात. आम्हीदेखील उभे राहू शकतो आणि या प्रकरणाची सुनावणी संपवू शकतो,’ असं संतप्त उद्गार गोगोईंनी काढले.

सुनावणीच्या ४० व्या दिवशी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी एक पुस्तक आणि काही दस्तावेज यांच्यासह वादग्रस्त राज जन्मभूमीची ओळख पटवून देणारा नकाशा न्यायालयासमोर ठेवला. मात्र मुस्लिम पक्षकारांच्या बाजूनं युक्तिवाद करणाऱ्या वकील राजीव धवन यांनी नकाशावर आक्षेप घेतला. मला हा दस्तावेज फाडण्याची परवानगी आहे का?, असं म्हणत त्यांनी नकाशाचे तुकडे केले.

हॅशटॅग्स

#Supreme Court(24)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या