14 December 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Kerala Boat Tragedy Video | केरळमध्ये 'हाऊसबोट' उलटून झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ समोर आला

Kerala Boat Tragedy Video

Kerala Boat Tragedy Video | केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलथिराम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ‘हाऊसबोट’ उलटून झालेल्या अपघातात महिला आणि मुलांसह २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाऊसबोटमध्ये 30 हून अधिक लोक होते.

क्रीडामंत्री व्ही अब्दुर्रहमान यांनी सांगितले की मृतांमध्ये शाळेच्या सुट्टीत फिरायला आलेल्या अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारतर्फे मदत जाहीर केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘केरळमधील मलप्पुरम येथे हाऊसबोट बुडाल्याच्या वृत्ताने व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी संवेदना आहे आणि मी जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी बचाव कार्यात अधिकाऱ्यांना मदत करावी.

केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जॉर्ज यांनी जखमींना शक्य तितक्या चांगल्या उपचारांची खात्री करण्याचे निर्देश दिले. तसेच मृतांचे मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kerala Boat Tragedy Video viral check details on 08 May 2023.

हॅशटॅग्स

#Kerala Boat Tragedy Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x