23 September 2021 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार

Jharkhand state government

मुंबई, २६ जुलै | झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्र झारखंड पोलिसांना मदत करेल:
झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार आहे. भाजपडून हे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती असताना भाजपचे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे झारखंडमध्ये गेले होते. असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार पाडताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा सहभाग पाहायला मिळाला होता असही मलिक म्हणाले आहेत. झारखंड सरकार पडताना भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होते. झारखंड पोलिसांनी अभिषेक दुबे याला याप्रकरणी अटक केली असून, त्याने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये भाजपच्या दोन आमदारांचे नाव समोर आहे. हे कोण आमदार आहेत हे झारखंड पोलीस तपास करणार आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे समोर आल्याचेही ते म्हणाले.

झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार:
या तपासासाठी महाराष्ट्र सरकार हे झारखंड पोलिसांना सर्वपरीने मदत करणार असल्याचे, मलिक यांनी सांगितले. चौकशीनंतर सगळे समोर येईल. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होऊ शकत नाही. मात्र, अन्य राज्यात कर्नाटकप्रमाणे ऑपरेशन लोटस सुरू आहे. ५० कोटी रुपये आणि मंत्रीपद अशी झारखंडमधील काँग्रेस आमदारांना ऑफर होती, असा दावा मलिक यांनी केला. बावनकुळे हे तेथे एका मद्य व्यापाऱ्याला भेटले. कोणत्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची बावनकुळे यांची भेट झाली, तेथे कोण होते, याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे मलिक यांनी सांगितले. आता चौकशीनंतर सगळी प्रकरणे उघड होतील. त्यात महाराष्ट्रातील कोण अधिकारी आहेत, हे देखील समोर येईल, असेही मलिक म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP attempt to overthrow Jharkhand state government news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(679)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x