13 August 2020 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

VIDEO: 'बलात्काराचे वेगळे नेचर असते', भाजपा मंत्र्याचं संतापजनक विधान

Narendra Modi, Amit Shah, BJP, Yogi Adityanath

लखनऊ : यूपीत सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपेंद्र तिवारी असे या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचे नाव असून त्यांनी बलात्कार वेगवेगळ्या नेचरचा असतो, असे संतापजनक विधान केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यूपीत अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याबाबत प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपेंद्र तिवारी म्हणाले, “बलात्काराचे वेगळे नेचर असते. आता जर कोणत्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार झाला तर त्याला आम्ही बलात्कार समजू. परंतु, काही ठिकाणी असे [पाहायला मिळत आहे की, विवाहित महिला आहेत. त्यांचे ३०-३५ वय आहे. त्याचे वेगवेगळे नेचर आहे.”

याचबरोबर, उपेंद्र तिवारी म्हणाले पुढे म्हणाले की, “सर्व अशा घटना असतात, सर्व गोष्टी पाहायला मिळतात की, जसे एखादी तरुणी आहे. तिचा ७-८ वर्षांपासून प्रेम प्रपंच सुरु आहे. मात्र तरी सुद्धा असे पाहायला मिळते की तिच्यासोबत असे (बलात्कार) काही झाले, तर साधा प्रश्न आहे की तिने ७ वर्षांपूर्वी हा प्रश्न उपस्थित का केला नाही. अशा प्रकारे सर्व विसंगती असून वेगवेगळे नेचर आहे. अशा प्रकारच्या घटना आहेत, त्यावर स्वत: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माहिती घेऊन कारवाई करत आहेत.”

दरम्यान, यूपीतील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत अतिशय खळबळजनक सत्य समोर येत असून, अनेक यातना देऊन या मुलीची हत्या करण्यात आल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे सत्य समोर आले आहे. या मुलीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह अजून २ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात अटक आरोपींची संख्या ४ झाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x