5 August 2020 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही - नारायण राणे दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
x

भाजपानं लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला 'बंधक' बनवलं आहे - काँग्रेस

Congress Leader Randeep Singh Surjewala, BJP Rajasthan, Political Crisis, Sachin Pilot

जयपूर, २४ जुलै : राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाराच्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. हा सत्तासंघर्षाचा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकांना पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयात पायलट गटाने आव्हान दिलं होतं. यावर आज राजस्थान उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पायलट गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

राजस्थानात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात हायकोर्टाच्या निर्णयानं आणखी भर पडली आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेल्यांना शुक्रवारी या प्रकरणाचा छडा लागेल असं वाटत होतं. पण तसे झाले नाही. सचिन पायलट गटाकडून या खटल्यात केंद्र सरकारला पक्षकार करा म्हणून अर्ज करण्यात आला त्यामुळे आता केंद्र सरकारची बाजूही हायकोर्ट ऐकून घेणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पायलट गटाला दिलेल्या नोटिशीबाबतही जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. दरम्यान, या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपावर हल्लाबोल केला. “भाजपानं संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल,” असं सुरजेवाला म्हणाले.

 

News English Summary: The battle between Ashok Gehlot and Sachin Pilot has been going on since last week. Meanwhile, Congress leader Randeep Sig Surjewala has targeted the BJP over the power struggle. Surjewala has accused BJP of circling the constitution.

New English Title: Congress Leader Randeep Singh Surjewala Criticize BJP Rajasthan Political Crisis PM Naredra Modi News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(394)#SachinPilot(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x