2 May 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

मोदींकडून योगींची स्तुती | एकाच वाक्यता ३ मोठी खोटी विधानं | त्यामुळेच जग तुम्हाला फेकू म्हणतं - काँग्रेस

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, १५ जुलै | देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता करोना नियंत्रणाबद्दल योगी सरकारचं कौतुक केलं आहे.

मोदी म्हणाले, 2017 पूर्वीही दिल्लीतून उत्तर प्रदेशसाठी पैसा पाठविला जात होता. मात्र, तेव्हा लखनौत त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत. स्वतः योगी येथे येऊन विकास कामांवर लक्ष ठेवतात. ते प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि वेग-वेगळ्या कामांवर लक्ष ठेवतात. यामुळेच उत्तर प्रदेशात परिवर्तन होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. आज गुन्हेगारांना समजले आहे, की ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे.

दरम्यान, मोदींनी केलेल्या स्तुतीनंतर समाज माध्यमांवर मोदींची मोदी प्रमाणात पुरावे देत खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आता विरोधकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी मोदींच्या वक्तव्यांचा समाचार घेताना ट्विट केलं आहे की, “मोदी वाराणसीत म्हणाले की यूपीत कायद्याचं राज्य आहे… योगिनीं माफिया राज संपवलं….. कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळली…. एकाच वाक्यता ३ मोठी खिटी विधानं… त्यामुळे जग तुम्हाला फेकू म्हणतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Srivatsa slams PM Narendra Modi after claiming about CM Yogi Adityanth CM term achievement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या