14 November 2019 1:09 PM
अँप डाउनलोड

कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर

karnataka DK shivakumar, money laundering case

नवी दिल्ली: लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. २५ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर झाला आहे. यासह कोर्टाने त्यांना देशाबाहेर जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कोर्टाने पुढे म्हटले आहे की जेव्हा कधी चौकशीची गरज लागेल तेव्हा संबंधित यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात डीके शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती.

आज सकाळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकचे माजी मंत्री डीके शिवकुमार यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला होता. कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सकाळी तिहार जेलमध्ये पोहोचल्या. कर्नाटकातील या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचं त्या म्हणाल्या. तिहार तुरुंगात पोहोचल्यानंतर सोनिया यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक केलेले ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही भेट घेतली.

हॅशटॅग्स

#Congress(290)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या