14 November 2019 1:13 PM
अँप डाउनलोड

फडणवीसांचं मोदींच्या पावलावर पाऊल; केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले

CM Devendra Fadnavis, Kedarnath Mandir, Kedarnath Temple

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत. फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.

विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास उरल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले आहे. झी २४ तास आणि ‘पोल डायरी’ यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला १२१-१२८, शिवसेना ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, एनसीपी ३५ ते ४२, वंचित १ ते ४ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १ ते ५ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे भाकीत कितपत खरे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. १९ मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार होतं. त्याआधी म्हणजेच १८ मे रोजी मोदी केदारनाथला गेले. त्यांनी जवळपास १५ तास एका गुहेत ध्यानधारणा केली. यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ३०३ जागा मिळाल्या.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(333)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या