3 December 2021 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Watch for Gain | या कंपन्यांमध्ये सकारात्मक आर्थिक घटनाक्रम | या शेअर्सवर नजर ठेवा Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला | तुमच्याकडे आहे? Cryptocurrency Prices Today | क्रिप्टो मार्केटमध्ये सुधारणा | जाणून घ्या आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती Stocks in Focus | 1 महिन्यात या 5 शेअर्समधून 13 ते 34 टक्क्यांपर्यंत रिटर्न | तुमच्या पोर्टफोलिओत आहेत? Stock Market LIVE | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्स 272 अंकांनी वाढला तर निफ्टी 17,473 च्या पुढे Stocks to Buy Today | आज हे ५ स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला | होल्डिंग टाईम १ आठवडा ATM Cash Withdrawal | ATM मधून पैसे काढणे महागणार | मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास इतके शुल्क आकारणार
x

एका प्रश्नावर नक्कीच विचार करा | शांतीने चाललेल्या आंदोलनातील हिंसेचा फायदा कोणाला झाला?

Congress spokesperson, Supriya Shrinate, BJP, Tractor rally

नवी दिल्ली, २८ जानेवारी: दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

हिंसाचाराप्रकरणी FIR दाखल करण्यात आल्या आहेत. FIR मध्ये सरकारी संपत्तीचं नुकसान, बंडखोरी, शस्त्रांत्रांचा समावेश, मारहाण असे कलम सामिल आहेत. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच दोन्ही बाजूने अनेक दावे करणारे व्हिडिओ अजूनही समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो मध्ये झळकलेले आणि काल उपद्रव माजविणारे आंदोलक फरार असल्याचं वृत्त आहे.

दुसऱ्या बाजूला या आंदोलनात सर्वात महत्वाची राज्य ही पंजाब आणि हरियाणा आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील दोन छोट्या शेतकरी संघटनांनी आंदोलनातून काढता पाय घेताच लगेचच आंदोलनात फूट पडल्याची वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. त्यानंतर लगेचच आंदोलक ज्या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहेत तेथील स्थानिकांनी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पत्रकारांकडूनच ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचं खालील व्हिडिओ मध्ये पत्रकारांच्या तोंडूनच सिद्ध होतंय.

एकूण घटनाक्रम पाहता शेतकऱ्यांचं नुकसान शेतकरी का करतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र यासर्व घटनाक्रमात सर्वाधिक फायदा हा भाजपचा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “झोपण्याआधी एका प्रश्नावर नक्कीच विचार करा, दूध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल….शांतपणे चाललेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचा फायदा कोणाला झाला?

 

News English Summary: Looking at the overall situation, the question arises as to why the farmers will suffer. However, the BJP has benefited the most from all these developments. Accordingly, Congress spokesperson Supriya Srinath has made a suggestive statement. He tweeted, “Before going to bed, think of a question, why milk and water will become water …. Who benefited from the violence in the peaceful peasant movement?”

News English Title: Congress spokesperson Supriya Shrinate slams BJP indirectly over tractor rally incident news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x