पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, सुप्रीम कोर्टात धाव
नवी दिल्लीः आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ‘बेपत्ता’ झाले असून, त्यांचा मोबाइलही स्वीच ऑफ आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’) पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावलीच; पण तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेऊनही चिदंबरम यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.
Arshdeep Singh Khurana, Lawyer of P Chidambaram: Furthermore, my client is exercising the rights available to him in law & had approached the Supreme Court on August 20 seeking urgent reliefs in respect of the order dismissing his anticipatory bail (in INX media case). https://t.co/Jm2BgJHiMb
— ANI (@ANI) August 20, 2019
दिल्ली हायकोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसमधील तीन ज्येष्ठ वकील चिदम्बरम यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत. अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शीद हे तिघेही त्यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी युक्तिवाद करणार आहेत. आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणी चिदम्बरम यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेल्या समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मागील काही वर्षांपासून ते चौकशीला हजर राहतात. त्यामुळे अटक करण्याचे कोणतेही कारण नाही, असा युक्तिवाद करणार आहे.
An extremely qualified and respected member of the Rajya Sabha, @PChidambaram_IN ji has served our nation with loyalty for decades including as Finance Minister & Home Minister. He unhesitatingly speaks truth to power and exposes the failures of this government,
1/2— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 21, 2019
चिदम्बरम यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जांवर जानेवारीत राखून ठेवलेला निकाल दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. सुनील गौर यांनी सकाळी जाहीर केला. निदान तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती चिदम्बरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी केली.परंतु तीही अमान्य झाल्यावर पी. चिदम्बरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी वकिलांनी लगेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यावर सरन्यायाधीशांकडून तातडीने सुनावणीचे निर्देश घेण्यासाठी धावपळ केली, पण संध्याकाळपर्यंत ही याचिका कोर्टासमोर आली नव्हती. आता बुधवारी सकाळी सरन्यायाधीशांना विनंती केली जाईल.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News