नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची शक्यता - रणदीप गुलेरीया
नवी दिल्ली, ३ डिसेंबर: कोरोनाची लस कधी येणार याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जगभरातील लोकं आहेत. कोरोनाच्या या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना (The director of Delhi AIIMS, Dr. Randeep Guleria expressed this while talking to ANI) व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींचं शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले, “भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लशींपैकी कोणत्याही लशीचा आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यता (Emergency use of any of these vaccines is likely to be approved by the end of December or in the first week of January.) आहे. याद्वारे सार्वजनिक लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लशीकरण आणि सिरिंजच्या उपलब्धतेसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरु आहे.”
“आपल्याकडे चांगली माहिती उपलब्ध आहे. म्हणजेच लस चांगल्याप्रकारे सुरक्षित आहेत. लशींची सुरक्षा आणि प्रभावशीलतेशी कदापी तडजोड करण्यात आलेली नाही. ७०,००० ते ८०,००० स्वयंसेवकांना लस देण्यात आल्या आहेत. यांपैकी कोणावरही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. डेटावरुन लक्षात येतं की, अल्पावधीत लस सुरक्षित आहेत,” असेही यावेळी गुलेरिया यांनी सांगितलं.
चेन्नईतील चाचणीदरम्यान झालेल्या साईड इफेक्टसाबाबत बातम्यांवर बोलताना डॉ. गुलेरिया (Speaking on the news about the side effects that occurred during the test in Chennai, Dr. Guleria said) म्हणाले, “चेन्नई चाचणी प्रकरणावर लसीऐवजी वेगळ्याच बाबतीत भाष्य करण्यात आलं आहे. जेव्हा मोठ्या संख्येने आम्ही लोकांना लस देतो तेव्हा त्यांपैकी काही जणांना कोणता ना कोणता आजार होऊ शकतो. जो लशीसंदर्भत नसतो”.
दरम्यान, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस कोव्हशिल्डची तिसऱ्या टप्प्यात चाचणी आंतरराष्ट्रीय स्तरावर समोर आली आहेत. तसेच, ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कंपनी लवकरच आपत्कालीन मंजुरीची तयारी करत आहे.
News English Summary: People all over the world are waiting for the corona vaccine to arrive. There is good news for Indians facing this corona crisis. Corona vaccine will be approved for emergency use in India by the end of December, hopes Delhi AIIMS director Dr. Randeep Guleria has expressed this while talking to ANI. Work is currently underway on six vaccines in the country. He also said that the final phase of testing of two of these vaccines is underway.
News English Title: Corona vaccine could be approved January according AIIMS director Dr Randeep Guleria news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News