3 May 2025 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी

Covid19, Corona Virus, Covaxin vaccination, Marathi News ABP Maza

हैदराबाद, १२ सप्टेंबर : अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.

देशात एकाबाजूला दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सनी लशीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे. करोना व्हायरसमुळे जगणं मुश्किल झालेल्या या काळात कोव्हॅक्सीन लशीचा प्राण्यांवरील पहिल्या फेजच्या चाचणीचा रिपोर्ट खूपच उत्साहवर्धक आहे. कुठल्याही लशीच्या निर्मितीला काही वर्ष लागतात. पण सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत काही महिन्यात यशस्वी लस निर्मितीचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे.

स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे.

स्वदेशी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळाली आहे. कोवॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी रोखण्यात आली आहे. लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

 

News English Summary: Animal trials of Bharat Biotech International Limited’s Covid-19 vaccine candidate, Covaxin, have been successful and the results showed the shot’s “remarkable immunogenicity and protective efficacy” in the Phase I clinical trials in India, the drugmaker has said.

News English Title: Covid19 Covaxin vaccination found effective in non human primates Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या