30 April 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

VIDEO: हे कसले पॉलिटिकल किडे? मोदी छत्रपती शिवाजी महाराज तर अमित शहा तानाजी

Delhi Assembly Election 2020, PM Narendra Modi, Amit Shah

नवी दिल्ली: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

मात्र या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला नाही. नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. ‘शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही यात घालण्यात आले आहेत.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते जय भगवान गोयल यांचे ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज यावर काय बोलणार, असा सवाल करत उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते. यानंतर उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा प्रतिवाद करताना छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्यामुळे राऊत यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे. त्यानंतरच आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी याबाबत केला आहे.

 

Web Title:  Delhi assembly election 2020 PM Narendra Modi face showing Chhatrapati Shivaji Maharah and Amit Shah face showing Tanhaji.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या