6 October 2022 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Tips To Reduce Dark Circles | महागड्या क्रिम्सने सुद्धा डोळ्याखालील डार्क सर्कल दुर होतं नाहीत?, नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
x

लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर नेमके काय करावे? - नक्की वाचा

disadvantage of our good nature

मुंबई, २९ जून | अनेकांना असा अनुभव येतो की, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही. लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. म्हणजे काय तर आपण कितीही चांगले वागलो, समोरच्याचा विचार करून वागलो तरी आपल्याबाबतीत मात्र तसे घडत नाही. आपल्याशी कोणी चांगले वागत नाही!! आपल्याला सतत गृहीत धरले जाते. आपल्याला न विचारता परस्पर काही निर्णय घेऊन आपल्यावर ते लादले जातात.

मित्रांनो, बरेचदा असे घडत असताना तुमच्या ते लक्षातही येत नाही किंवा लक्षात आले तरी एकूण परिस्थितीचा विचार करून आणि अंगभूत चांगुलपणाने तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. परंतु सहन करण्याला देखील मर्यादा असते. शेवटी कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होतो आणि त्याचा त्रासही तुम्हालाच होतो. असे वाटू लागते की भलाईचा जमानाच उरला नाही, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपण आणखीच अस्वस्थ होऊ लागतो. परंतु मित्रांनो, आता हे सहन करत बसण्याची गरज नाही. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर काय करावे, तुम्ही त्यावर कसे वागावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

१. सर्वांसाठी सतत अव्हेलेबल असणे कमी करा: सर्वात आधी तर ही गोष्ट लक्षात घ्या की सतत सर्वांसाठी अव्हेलेबल असणे कमी करा. तुम्ही जर सतत इतरांसाठी वेळ काढत राहिलात, त्यांची कामे करत राहिलात तर तुमच्या वेळाला काही किंमत उरणार नाही. तुमच्या कामे करण्याला सतत गृहीत धरले जाईल. याचा अर्थ असाही नाही की कुणासाठी काही करूच नका. परंतु जे काही कराल ते स्वतःचा आब राखून करा. जेवढं शक्य असले तेवढंच करा. सतत धावून धावून, आपली कामे सोडून इतरांसाठी काही करत बसण्यामुळे इतरांच्या दृष्टीने आपली किंमत कमी होते. तसे होऊ देऊ नका.

असे बरेचदा गृहीणींच्या बाबतीत घडते. ती सतत घरी असते त्यामुळे तिला गृहीत धरून सर्वजण वागतात. तिच्या वेळेला, तिच्या प्रायोरिटीला काही किंमत दिली जात नाही.

२. नाही म्हणायला शिका: तुमच्या चांगुलपणाचा इतर लोक गैरफायदा घेत असतील तर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे नाही म्हणायला शिका. अनेकदा असे होते की तुम्हाला एखादे काम करणे जमणार नसते परंतु केवळ समोरच्या व्यक्तीला नाही म्हणू न शकल्यामुळे तुम्ही ते काम करता. मग भलेही त्यासाठी कितीही त्रास होवो. परंतु हे करणे टाळा. अशा वागण्यामुळेच समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते. जे काम तुम्हाला जमणारे नाही ते काम करायला स्पष्ट नकार द्यायला शिका.

३. स्वतः साठी सुद्धा वेळ काढा: अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की जो वेळ तुम्ही इतरांना देता तेवढाच वेळ स्वतःलाही द्यायला शिका. असे होऊ देऊ नका की तुम्ही इतरांसाठी इतका वेळ देत आहेत की तुम्हाला स्वतःसाठी काही वेळच उरत नाही. कधी कधी इतरांसाठी वेळ काढता काढता आपण इतके बिझी होऊन जातो की, आपली स्वतःची कामे मागे पडत जातात. असे करण्याने इतरांना तर फायदा आहे पण तुमचे मात्र नुकसान होते.

तुमचे काम तुम्हालाच पूर्ण करावे लागणार ना! मग असे असताना जर तुम्ही आधी स्वतःचा विचार केला तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही. विमानात देखील असे सांगितले जाते की आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतरांना मदत करण्याआधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा. म्हणजेच आपण स्वतः ठीक असलो तर इतरांना चांगली मदत करू शकू. मग हेच आपण जीवनात सर्वत्र अप्लाय करायला नको का? आधी स्वतःसाठी वेळ काढा आणि मग तो इतरांना द्या.

४. सतत इतरांना काय वाटेल ह्याचा विचार करणे सोडून द्या: कोणाला तुमच्या वागण्यामुळे काय वाटेल, कोणाला किती वाईट वाटेल ह्या गोष्टींचा विचार करत बसलात की तुम्ही त्याच विचारात हरवून जाणार. मग तुम्हाला तुमचा स्वतःचा विचार करणे जमत नाही. म्हणून आधी स्वतःची काळजी करा. मग इतरांना काय वाटेल ह्याची.

असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तेव्हा तुमचाच समज असा होऊ लागतो की, ‘सगळीकडे सर्व जण मजेत असतात, आपापले आयुष्य जगत असतात. फक्त आपण इतरांची काळजी करत राहतो.’

५. आपल्या आयुष्याचा कंट्रोल इतरांकडे देऊ नका: आता सर्वात महत्वाचा मुद्दा. तो म्हणजे कोणालाही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल घेऊ देऊ नका. तुम्हाला गृहीत धरले की लोक तुमच्याबद्दल परस्पर निर्णय घेऊ लागतात. तुम्हाला न विचारता गोष्टी ठरवतात. अनेक लहानलहान बाबींपासून ह्याची सुरुवात होते आणि मग हळूहळू मोठे निर्णयही घेतले जाऊ लागतात. असे होऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यावर तुमचा स्वतःचा कंट्रोल राहील असे बघा. इतका चांगुलपणा तरी काय कामाचा की तुम्हाला तुमचे मत सांगता येऊ नये, इतरांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे सांगता येऊ नये, इतरांनी तुम्हाला गृहीत धरावे…

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Does peoples are taking disadvantage of our good nature article news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x