13 July 2020 7:23 AM
अँप डाउनलोड

नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’, केवळ धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न: तरुण गोगोई

PM Narendra Modi, Former Assam Chief Minister Tarun Gogoi

नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याचबरोबर, तरुण गोगोई यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे, त्यावरुन लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटनांची हिंदुत्त्व विचारसरणी नाकारली असल्याचे सिद्ध होत आहे असे सांगत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, “आम्ही हिंदू आहोत. परंतु देशाला हिंदू राष्ट्र होताना पाहू शकत नाही. विरोध करणाऱ्यांमध्ये जास्तकरून हिंदू आहेत. जे भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या हिंदुत्वाला नाकारत आहेत.”

गोगोई यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरून विद्यापीठ हिंसाचारावरही भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आमच्यावर आरोप करतात की, आम्ही (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलतो. परंतु, त्याने स्वत:लाच पाकिस्तानच्या स्तरावर आणून ठेवले आहे. मोदी हे मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्रवादाकडे सरकत आहेत. ते आता भारताचे हिंदू जीना म्हणून पुढे येत आहेत, अशा शब्दात गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

Web Title:  Former Assam Chief Minister Tarun Gogoi Prime Minister Narendra Modi Pakistan Hindu Jinnah NRC CAA.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1246)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x