4 May 2025 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोना रुग्ण संख्या विक्रम, रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर

India, Russia, Covid 19 Record

नवी दिल्ली, ६ जुलै : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४,२४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ६ लाख ९७ हजार ९१३ इतका पोहोचला आहे. तर यामध्ये मृतांचा आकडा हा १९ हजार ६९३ इतका आहे.

आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांत १५ हजार ३५० रूग्णांनी कोरोनाशी दोन हात केले आहे. देशात ऍक्टिव केसची संख्या २ लाख ५३ हजार २८७ इतकी आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, ५ जुलैपर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ लोकांची स्लॅब टेस्ट करण्यात आली. कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकलं आहे. भारत त्या टॉप तीन देशात आहे जेथे कोरोनाचं संक्रमण सर्वाधिक आहे. अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत.

देशात सध्या कोरोनाचे 6 लाख 97 हजार 413 कोरोना रुग्ण आहेत. यासह रशियाला मागे टाकत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रशियामध्ये कोरोनाचे 6 लाख 81 हजार 251 रुग्ण आहेत. कोरोनाच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत 29 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 17 हजार 244 नवीन प्रकरणं समोर आली. अमेरिकेत कोरोनामुळं 1 लाख 32 हजार 382 लोकांचा मृत्यू झाला.

 

News English Summary: India now ranks third behind Russia. There are 6 lakh 81 thousand 251 patients of corona in Russia. The United States ranks first in Corona’s statistics. There are more than 29 million coronary heart disease patients in the United States.

News English Title: India reports a spike of 24248 new in last 24 hours surpasses Russia in Covid 19 positive patients News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या