29 September 2020 2:59 AM
अँप डाउनलोड

लष्कराने कुपवाडा जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना जिवंत पकडलं

श्रीनगर : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील हंदवाड्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीनं केलेल्या धडक कारवाईत चार दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. मात्र या कारवाई दरम्यान अल बदर या आतंकवादी संघटनेतील ३ आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्थानिक पोलिसांनी तसेच लष्कराने माहिती मिळताच हंदवाड्यात धडक शोध मोहीम उघडली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराने आतंकवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं होत. त्यानंतर ४ आतंकवादी लष्कराला शरण आले. सीमारेषा ओलांडून काही नवखे आतंकवादी घुसण्याचा तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, त्यानुसार धडक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

बराचवेळ चकमक सुरु होती परंतु अखेर लष्कराच्या आवाहनाला प्रतिसाद देत ४ आतंकवादी लष्कराला शरण आले आणि ३ आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले अशी माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी प्रसार माध्यमांना दिली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianArmy(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x