18 May 2021 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

झारखंड: मतदाराने मोदी-शहा जोडीसहित भाजपला नाकारलं; काँग्रेस-झामुमोची मुसंडी

PM Narendra Modi, Amit Shah, Jharkhand Assembly Election 2019

रांची : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणी आज सुरु झाली. या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय. पहिला कल ९ वाजता येणार होता, ज्यामध्ये एकूण ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानुसार झारखंडमधून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पाय उतार व्हावे लागणार असल्याचेच निवडणूक निकालाच्या कलातून दिसत आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस-जेएमएम आणि भारतीय जनता पक्षामध्ये अटीतटीची लढाई काळ दिसत होती. मात्र, काही मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यानंतर ३२ जागांवर आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पक्षाची घसरगुंडी उडाली आहे. भारतीय जनता पक्ष २७ जागांवर तर काँग्रेस-जेएमएमची वाटचाल पन्नाशीकडं सुरू झाली असून, सध्या ४३ जागांवर आघाडी घेतली आहे.

दरम्यान, “या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा सफाई होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो. सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री होणाह आहेत,” असा दावा त्यांनी केला. दरम्यान या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या. मात्र निकालाचे एकूण कल पाहता झारखंड मधील मतदाराने मोदी-शहा जोडीला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

Web Title:  Jharkhand Assembly Election 2019 PM Narendra Modi and Amit Shah got big set back after counting.

हॅशटॅग्स

#Amit Shah(256)#Narendra Modi(1546)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x