19 January 2022 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | 700 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 5 स्टॉकमध्ये दिग्गज गुंतवणूदाराची गुंतवणूक | शेअर्सची यादी पहा Mutual Funds For Children | तुमची मुले देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात | प्रक्रिया जाणून घ्या HDFC Mutual Fund Schemes | 5 वर्षात पैसा दुप्पट करणाऱ्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 5 योजना | SIP रु. 500 Best Bluechip Mutual Fund | तब्बल ६९ टक्के रिटर्न देणारा टॉप रेटेड ब्लूचिप म्युच्युअल फंड | फायद्याची बातमी वाचा Penny Stock Return | फक्त 40 पैशाच्या पेनी शेअरची कमाल | गुंतवणूकदार 500 टक्के नफा घेत मालामाल Multibagger Stock | 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअरने 243 टक्के रिटर्न | नफ्याच्या शेअरबद्दल जाणून घ्या FD Investment | फिक्स डिपॉझिटसाठी योग्य पर्याय कोणता? | बँक, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणता | घ्या जाणून
x

विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, Kolhapur, CM Uddhav Thackeray

कोल्हापूर: एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे.

आज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर , सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे.

सरकारची कर्जमाफीची उधारीची घोषणा आहे. आजच्या अडचणीतील शेतकऱ्यांना थेट मदत होणं गरजेचं होतं. त्याचबरोर सर्व प्रकारची मध्यम-दीर्घ मुदतीची सर्व कर्जे माफ केल्यासच सातबारा कोरा होतो. यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारनेच घेतला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या भागात या नव्या कर्जमाफीचा उपयोग होणार नाही. उलट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला पाहिजे असं फडणवीस म्हणाले.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. राज्याची अर्थव्यवस्था १५.८ टक्के आहे. सकल उत्पन्नात राज्याची अवस्था चांगली आहे. सकल उत्पनाच्या १५.८ टक्के इतके कर्ज आहे, २६ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनाना उद्धव ठाकरेंनी असा शब्द दिला होता का की, दोन्ही काँग्रेसच्या जीवावर सत्ता स्थापन करणार? असा बोचरा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadnavis Press Conference at Kolhapur.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x