1 May 2025 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

75 वर्षाहून जास्त वय असणाऱ्यांनी निवडणुकीत संन्यास घ्यावा असे मोदी म्हणालेले | मग 2024 मध्ये उमेदवार कोण? - स्वामी

Loksabha Election 2024

नवी दिल्ली, २७ जून | भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोकठोक मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा स्वामींची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेपेक्षा बरीच वेगळी असली तरी ते उघडपणे आपली मतं मांडताना दिसतात. जम्मू काश्मीर, 2024 लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आदी मुद्यांवर एका मराठी वृत्तवाहिनीशी सुब्रमण्यम स्वामी यांनी ऑनलाईन मुलाखतीत चर्चा केली.

भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी चीनवरील सरकारच्या कारवाईवर समाधानी नाहीत. चीनला भारतीय सीमेच्या आत का येऊ दिले. चीनला धडा शिकवायला हवा होता, असे ते म्हणाले. तसेच अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची बैठक घेतल्याचा दावाही त्यांनी केला. याचबरोबर2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 75 वर्षापेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत संन्यास घ्यावा असे मोदी म्हणाले होते. तर 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, हे मोदींनी जाहीर करावे. कारण, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना पूर्वीच बाजूला केले आहे, असे सुब्रमण्यम यांनी म्हटलं.

सदर मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आली की, ‘2022 मध्ये 5 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. देशात भाजपाविरोधी वातावरण करण्यासाठी तयारी चालू आहे. याचा पंतप्रधान मोदी किंवा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होईल का?

त्यानंतर उत्तर देताना स्वामी म्हणाले की, ‘2024 लोकसभा निवडणुकांसाठी मोदींनी सर्वप्रथम पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे घोषित करावे. कारण, 75 वर्षापेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत संन्यास घ्यावा असे मोदी म्हणाले होते. तर 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, हे मोदींनी जाहीर करावे. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना वयाचा दाखला देत पूर्वीच बाजूला केले आहे. हेच मोदींना लागू होईल की नाही? यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Loksabha Election 2024 BJP leader Subramanian Swamy raised question over PM Narendra Modi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या