17 April 2021 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

#VIDEO: राहुल गांधींच्या एका व्हिडिओ पुराव्याने मोदींसहित संपूर्ण भाजप तोंडघशी

MP Rahul Gandhi, PM Narendra Modi

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे. रेप इन इंडिया वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर टीका करत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ घातला होता. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझ्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत. हा व्हिडीओ मी ट्विट करणार आहे जेणेकरुन सर्वांना पाहता येईल. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ईशान्य भारत जाळत आहेत. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष माझ्यावर आरोप करत आहेत”. दरम्यान सांगितल्याप्रमणे राहुल गांधी यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने मोदींसहित संपूर्ण भारतीय जनता पक्षचं तोंडघशी पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता. त्यावर भाष्य करताना पंतप्रधान मेक इन इंडियाची भाषा करतात. मात्र जिथं पाहावं तिथं रेप इन इंडिया झाला आहे, असं मी म्हटलं होतं, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला.

 

Web Title:  MP Rahul Gandhi Shared PM Narendra Modi Old Video where Narendra Modi used Word Rape Capital

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1483)#Rahul Gandhi(219)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x