26 April 2024 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार | जेडीयू महागठबंधनच्या संपर्कात?

Bihar JDU party, CM Nitish Kumar, Mahagathbandhan

पाटणा, ०१ जानेवारी : बिहारमध्ये पडद्याआड सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यात देशातील मोठ्या राजकीय व्यक्ती उतरल्या आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि स्वतः लालूप्रसाद यादव यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं आहे. या संदर्भात तेजस्वी यादव मोठी राजकीय योजना आखात आहेत ज्याचा थेट २०२४ मधील निवडणुकीशी संबंध आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. कारण अरुणाचल प्रदेशात भाजपनं नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) ७ पैकी ६ आमदार फोडले आणि सहकारी पक्ष म्हणून स्वतःची विश्वासाहर्ता संपवली आहे. तसाच प्रयोग बिहारमध्ये करून मित्रपक्ष जेडीयूचं अस्तित्व धोक्यात आणलं जाऊ शकतं अशी शंका जेडीयूला सतावत असल्याने महागठबंधन कार्यरत झालं आहे.

त्यामुळे जेडीयूला सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवण्याचा राजदचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द लालू प्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीश कुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमधील (यूपीए) वरिष्ठ नेते देखील कार्यरत झाले असल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: In Bihar, big political developments are taking place behind the scenes and some of the biggest politicians in the country are involved. Former Bihar Chief Minister Rabadevi and Lalu Prasad Yadav himself have also taken notice. In this context, Tejaswi Yadav is making big political plans which are directly related to the 2024 elections.

News English Title: Bihar JDU party may join Mahagathbandhan to for new government in Bihar news updates.

हॅशटॅग्स

#Bihar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x