19 January 2025 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Forbes India Rich List 2021 | मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत | अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ

Forbes India Rich List 2021

मुंबई, ०७ ऑक्टोबर | फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Forbes India Rich List 2021) सुमारे 92.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 6.89 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

Forbes India Rich List 2021. Reliance chairman Mukesh Ambani retained the title of richest Indian as he added $4 billion to his net worth (which has now reached $92.7 billion) in the year 2021, according to Forbes magazine’s 100 richest Indians list :

फोर्ब्स एशियाच्या ताज्या अंकातील या यादीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी 74.8 अब्ज डॉलर (सुमारे 5.6 लाख कोटी रुपये) संपत्तीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

फोर्ब्समध्ये भारताचे कौतुक:
या अहवालात भारताची स्तुती करताना असे म्हटले गेले आहे की, कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चांगला सामना केल्यामुळे जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. शेअर बाजारात बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे देशातील 100 श्रीमंतांची संपत्ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या 12 महिन्यांत, त्याची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली. ती सुमारे 257 अब्ज डॉलर वाढीसह 775 अब्ज डॉलर झाली आहे.

अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ
अहवालानुसार, या वाढीचा सुमारे 20 टक्के भाग एकटा गौतम अदानींचा आहे, त्यांची संपत्ती एका वर्षात जवळपास तीन पटींनी वाढून 74.8 अब्ज डॉलर (सुमारे 5.6 लाख कोटी रुपये) झाली आहे. सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंतांच्या या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

मुकेश अंबानी 2008 पासून सातत्याने या यादीत पहिल्या स्थानावर राहिले आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नादर 31 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत आणि राधाकृष्ण दमानी 29.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह यादीत चौथ्या स्थानावर आहेत. सायरस पूनावाला पाचव्या, लक्ष्मी मित्तल सहाव्या, सावित्री जिंदल सातव्या, उदय कोटक आठव्या, पलोनजी मिस्त्री नवव्या आणि कुमार मंगलम बिर्ला 10 व्या क्रमांकावर आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Forbes India Rich List 2021 Mukesh Ambani richest person in India.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x