23 April 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

Multibagger Stocks | या 5 शेअर्सनी 14-15 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 1-2 कोटी रुपये केले, या 5 टॉप मल्टीबॅगर स्टॉकची यादी सेव्ह करा

Multibagger stocks

Multibagger Stocks | सध्या शेअर बाजार चांगलाच गडगडला आहे. जेव्हा स्टॉक पडले असतात, हीच गुंतवणूकीची योग्य संधी असते. सध्या बरेच लहान मोठे कंपनीचे शेअर्स स्वस्तात मिळत आहेत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल आणि मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 धमाकेदार स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे स्टॉक पुढील काळात तुम्हाला जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतात. या स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना कडक परतावा मिळवून दिला आहे. कोणत्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवताना थोडीफार जोखीम तर असतेच,आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये हा धोका जास्त असतो, तर मोठ्या कंपन्यांमध्ये कमी जोखीम असते.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेड :
ही एक वेअरहाऊस कंपनी आहे. या कंपनीने फक्त साडेतीन वर्षांत आपल्या भागधारकांना हजारो पट नफा कमावून दिला आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 0.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात भरघोस वाढ होऊन आता हा शेअर 147 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील साडेतीन वर्षात या शेअर ने आपल्या भागधारकांना 41,971.43 टक्के नफा कमावून दिला आहे.

हॅवेल्स इंडिया :
ही एक इलेक्ट्रिक वस्तू बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्स गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. 2001 साली हा शेअर 1.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गेल्या काही वर्षात या स्टॉक जबरदस्त 714 पटीने वाढ झाली असून शेअर आता 1349 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्यावेळी हा स्टॉक 1.89 रुपये किमतीवर होता, तेव्हा जी तुम्ही 14,000 रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी रुपये झाले असते.

HDFC Bank:
ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँकेच्या शेअरने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 259 पट अधिक वाढवले आहेत. 1999 साली HDFC Bank चा शेअर 5.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गेल्या काही वर्षात ह्या स्टॉक मध्ये 25802 टक्क्यांची वाढ झाली असून स्टॉक सध्या 1429.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सोलर इंडस्ट्रीज :
सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर ने बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या भागधारकांना कडक परतावा कमावून दिला आहे. मागील 15 वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 3,827 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 90 पट अधिक नफा कमावून दिला आहे.

EP बायोकंपोजिट्स :
गेल्या काही वर्षात भागधारकांना मालामाल बनवणाऱ्या स्टॉक च्या यादीत EP बायोकंपोजिट्स कंपनीचाही समावेश होतो. 20 दिवसांपूर्वी बाजारात लाँच झालेला हा शेअर गेल्या 13 ट्रेडिंग सेशनपासून अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 126 रुपये प्रति शेअर होती, मात्र त्यात आता मजबूत वाढ होऊन शेअरची 346.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top five Multibagger stocks has given huge returns on investment in short term on 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x