1 December 2022 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
x

Sunburn Tips | सूर्यप्रकाशाचा परिणाम त्वचेवर होतो, उन्हापासून त्वचेचे रक्षण कसे कराल? या '5' टिप्स फॉलो करा

Sunburn Tips

Sunburn Tips |  बघता बघता उन्हाळा सीझन सुरु होईल मात्र यावेळी काही लोक त्वचेची काळजी घेत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये घर बसल्या कशी काळजी घ्यायची याबाबत काही उपाय सांगणार आहोत. विशेषत: या ऋतूमध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे, कारण कधी कधी इच्छा नसतानाही उन्हामध्ये जावे लागते. परिणामी, सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्नच्या रूपामध्ये सुरू होतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

काकडी :
उन्हाळ्यामध्ये त्वचेला काकडी लावल्याने खूप फायदा होतो. काकडीत असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक टॅनिंग दूर करण्यास मदत करतात आणि सूर्यप्रकाशापासून आराम देतात. यासाठी तुम्ही काकडीचे तुकडे करून त्वचेवर ठेवू शकता किंवा काकडी किसून उन्हात जळलेल्या त्वचेवर लावू शकता.

लिंबू :
लिंबाचा वापर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केला जातो, परंतु त्याचा वापर सन टॅनिंगसाठी देखील केला जाऊ शकतो तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. तुम्ही ते दिवसातून एक किंवा दोनदा चेहऱ्यावर लावू शकता.

कोरफड जेल :
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरफड जेल हे सूर्याच्या हानिकारक किरणांच्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी मानली जाते. कोरफडीचे जेल त्वचेवर लावल्याने उन्हामुळे होणारी खाज आणि जळजळ यापासूनही त्वचेला लवकर आराम मिळतो.

हळद आणि बेसन पॅक :
जर तुम्हाला सन टॅनपासून लवकर सुटका हवी असेल, तर बेसन आणि हळदीचा हा पॅक तुमच्या त्वचेची डेड स्किन काढण्यासाठी काम करते तसेच हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते.

दही :
दही चेहऱ्यासाठी खूप चांगले आहे कारण इतर गोष्टींमध्ये दही मिसळण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो, त्यामुळे चेहरा साफ होतो. उन्हाचा त्रास होत असला तरीही थंड दही खूप फायदेशीर ठरते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sunburn Tips to look beautiful always checks details 07 October 2022.

हॅशटॅग्स

Sunburn Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x