19 April 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

तृणमूलच्या मेकओव्हरची तयारी सुरु; प्रशांत किशोर तयार करणार ‘ब्रँड ममता’

Political strategist prashant kishor, prashant kishor, PK prashant kishor, Mamta banerjee, trunmool congress party, West bengal

कोलकत्ता : २०१२ मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममतादीदी गेले काही वर्षे देशातील राजकारणात मागे पडल्याचे चित्र आहे. तृणमूलमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यासाठी आणि ब्रँड ममता तयार करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर याची मदत घेतली जाणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तर यासाठी राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. यावर उत्तर देतांना, एके काळी ममता यांच्या मर्जीतील नेते मानले जाणारे आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये असेलेल्या मुकुल रॉय यांनी ममतांबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. बंगालमध्ये ममतांची लाट ओसरली आसून, त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ममतांनी साडी कोणती नेसावी, वेणी कशी घालावी आणि हात कसा हालवावा, हे आता प्रशांत किशोर ठरवतील, असे रॉय म्हणाले.

तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक भाषा, आक्रमक विचार यासाठी ओळखल्या जातात. मात्र, किशोर यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली भविष्यात ममतादीदी मृदू आणि कमी आक्रमक पाहायला मिळणार आहे. २०२१ मधील पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून हा मेकओव्हर करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षासारख्या विशिष्ट विचारसरणी आणि कॉर्पोरेट कंपनीसारखा सेटअप असलेल्या राजकीय पक्षाशी कसे लढावे हे किशोर सांगणार आहेत, असे तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. तळागाळातील लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दीदी के बोलो’ (दीदीला सांगा) नावाने मोहीम सुरू केली आहे.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x