2 May 2025 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी - आठवलेंचा सल्ला

Rahul Gandhi, Hum do hamare, Ramdas Athavale

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी: केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपलं भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. रामदास आठवलेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींना हा मोलाचा सल्ला दिलाय.

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘हम दो, हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं.

 

News English Summary: Union Minister Ramdas Athavale is always in the limelight due to his speeches and poems. Now Union Minister Ramdas Athavale has given valuable advice directly to Congress leader Rahul Gandhi. Ramdas Athavale advised Rahul Gandhi to get married and implement Hum Do Humare Do. Ramdas Athavale was speaking at a press conference in Pimpri-Chinchwad.

News English Title: Rahul Gandhi should get married to implement hum do hamare do advice from union minister Ramdas Athavale news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या