17 April 2021 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

अमेरिकेत राजकीय क्रांती | कारण तिथल्या बुद्धिवंत व पत्रकारांनी 'ट्रम्प नाही तर कोण?' असा प्रश्न...

RTI activist, Saket Gokhale, Indian journalist, US President Joe Biden

मुंबई, २० जानेवारी: डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स हे मात्र उपस्थित होते. याशिवाय बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा हे माजी अध्यक्षही सपत्नीक उपस्थित होते. लेडी गागा, जेनिफर लोपेझ अशा अनेक कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. बायडेन यांचे भाषण भारतीय वंशाचे सहायक विनय रेड्डी यांनी लिहिले होते.

अमेरिकेत एक अनपेक्षित राजकीय क्रांती झाली आणि अमेरिकेतील मतदारांनी सर्वच जगाला धक्का दिला. यालाच अनुसरून आरटीआय एक्टिविस्ट साकेत गोखले यांनी भारतातील राजकीय स्थितीतवर भाष्य केले आहे. कारण भारतात जेव्हाही मोदींव्यतिरिक्त इतर नेतृत्वाची चर्चा होते तेव्हा भारतीय प्रसार माध्यमं एकाचं प्रश्नाचा भडीमार सुरु करतात आणि तो म्हणजे ‘मोदी नाही तर कोण’ किंवा “मोदींना पर्याय कोण’. जणू देशात यापूर्वी कोणीच पंतप्रधान झाले नाहीत. वास्तविक हा भारतीय पत्रकारितेतील ‘पेड’ प्रश्न झाला आहे. यासंदर्भात ट्विट करताना साकेत गोखले यांनी म्हटलं आहे की. “अमेरिकीत राजकीय बदल झाले कारण तिथल्या बिद्धीवंत आणि पत्रकारांनी “ट्रम्प नाही तर कोण” असे सतत मारा करणारे प्रश्न उपस्थित केले नाहीत.

 

News English Summary:

News English Title: RTI activist Saket Gokhale indirectly criticised Indian journalist after political changes in America news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x