5 August 2020 4:25 PM
अँप डाउनलोड

पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

P Chidambaram, Supreme Court, inx media case

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार (INX Media) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आता ईडीकडून त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. आज दुपारपर्यंत चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिदंबरम यांच्याविरोधात ठोस पुराव असल्याचा दावा ईडीनं केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करु शकता असं सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. सीबीआयबरोबरच सक्तवसुली संचलनालयाकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

सुप्रीम कोर्टाने अर्ज फेटाळताना सांगितलं आहे की, “प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा आणू शकतं. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे,”.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#P Chidambaram(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x