11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

निर्भया प्रकरण : नराधमांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा स्थगिती

Nirbhaya Rape Case, Delhi Nirbhaya Gangrape

नवी दिल्ली: दिल्लीसह देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणात 4 गुन्हेगारांना उद्या म्हणजे 3 मार्चला फाशी देण्यात येणार होती. पण अखेरच्या क्षणी कोर्टाने या चौघांची फाशी थांबवण्याचे आदेश दिले. पटियाला न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पुढचे आदेश मिळत नाहीत तोवर आता ही फाशी होणार नाही.

या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच्यासह इतर तीन दोषींना मंगळवारी फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवन गुप्ता यांच्या वकिलांना खडे बोल सुनावले. न्यायालय म्हणाले, तुम्ही आगीशी खेळता आहात. तुम्हाला सतर्क राहिले पाहिजे. कुणाकडून एक चुकीचे पाऊल उचलले गेले तर त्याचे परिणाम काय होतील, तुम्हाला माहितीये. विनय शर्मा, मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी दोषींची नावे आहेत.

निर्भयाच्या आईने पुन्हा दोषींची फाशीची शिक्षा कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत टळल्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याच्या स्वत: च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्ट इतका वेळ का घेत आहे? असा सवाल निर्भयाची आई आशादेवी यांनी उपस्थित केला. तसेच वारंवार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलणं हे आपल्या सिस्टमचे अपयश दर्शवते आणि आपली संपूर्ण सिस्टम गुन्हेगारांना अभय देते असल्याची कटू प्रतिक्रिया आशादेवी यांनी दिली.

 

News English Summery: Four criminals were to be hanged tomorrow, March 3, in a fearless gang-rape case involving Delhi. But at the last moment, the court ordered the four to be hanged. The Patiala court has stayed the death sentence till the next order. It will no longer be executed until further orders are received. The mercy petition of Pawan Gupta, a convict in the case, is pending with the President. The court, however, said that three others, including him, could not be hanged on Tuesday. During the hearing, Additional Sessions Judge Dharmendra Rana heard Pawan Gupta’s lawyers speak out loud. The court said, you are playing with fire. You have to be careful. You know what the consequences are if someone takes a wrong step. The names of the accused are Vinay Sharma, Mukesh Kumar Singh, Pawan Gupta and Akshay Thakur.

 

News English Title: Story court stays execution of Delhi Gangrape convicts as mercy plea pending in Court.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x