12 December 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त, मुलांच्या शाळाही जळून राख, महिलांचा रोष रस्त्यावर

Manipur Violence

Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त आली असून मुलांच्या शाळाही जळून राख झाल्याने महिलांचा रोष आता रस्त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी दिसत नसल्याने सर्व रोष सुरक्षा यंत्रणांवर व्यक्त होतं असल्याने परिस्थती अजून गंभीर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे मागील ५० दिवस संपूर्ण राज्य दंगल आणि हिंसाचाराने जळत असताना देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्द काढलेला नसल्याने भाजप विरोधात रोष विकोपाला पोहोचल्याच स्थानिक वृत्त वाहिन्या सांगत आहेत.

गेल्या ५० दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या विळख्यात सापडलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करून १२ जणांची सुटका केली. महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० जणांच्या जमावाने घेराव घातला आणि शोधमोहीम उधळून लावल्यानंतर अटक करण्यात आलेल्या १२ कांगलेई यावल कन्ना लुप (केवायकेएल) दहशतवाद्यांना तेथून जाण्यास भाग पाडण्यात आले, अशी माहिती सुरक्षा दलांनी शनिवारी दिली. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

लष्कराच्या प्रवक्त्यानेही या घटनेला दुजोरा देत सांगितले की, दिवसभरात लष्कराने शोध मोहिमेचा एक भाग म्हणून केवायकेएलच्या १२ सदस्यांना अटक केली होती, ज्यात २०१५ च्या घातपाताचा मास्टरमाइंड मोइरंगथेम तांबा ऊर्फ उत्तम चा समावेश होता. मात्र येथे लोकांच्या जगण्याचा मार्गच उध्वस्त झाल्याने लोकांनी शस्त्र हातात घेण्यास सुरुवात केली आहे.

दुपारी अडीचच्या सुमारास गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्वेकडील इथाम गावात कारवाई सुरू केली. या कारवाईचा एक भाग म्हणून गावाला घेराव घालण्यात आला, ज्यामध्ये केवायकेएलच्या 12 कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रे, दारुगोळ्यासह पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी २०१५ च्या डोगरा हल्ल्याचा सूत्रधार स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल मोइरांगथेम तांबा ऊर्फ उत्तम याची ओळख पटली आहे.

काही वेळाने महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १२०० ते १५०० जणांच्या जमावाने तातडीने ज्या भागात ही कारवाई करण्यात आली त्या भागाला घेराव घातला आणि सुरक्षा दलांची कारवाई पुढे जाण्यापासून रोखण्यात आली, असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. महिलांच्या आक्रमक जमावाला सुरक्षा दलांना कायद्यानुसार कारवाई सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे वारंवार आवाहन करण्यात आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महिलांची आक्रमकता आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन केवायकेएलच्या १२ कार्यकर्त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, सुरक्षा दलांनी जप्त केलेली स्फोटके आणि इतर शस्त्रे जप्त केली.

महिलांच्या नेतृत्वाखाली जमावाने सुरक्षा दलांना शोधमोहीम राबवण्यापासून रोखल्याचा मुद्दा संपूर्ण मणिपूरमध्ये गाजत आहे. २२ जून रोजी महिला आंदोलकांच्या नेतृत्वाखाली जमावाने शस्त्रांच्या लूटमारीचा तपास करण्यासाठी मणिपूर पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या सीबीआयच्या पथकाला पुढे जाण्यापासून रोखले होते. २३ जून रोजी लष्कराने ट्विट केले होते की, महिलांच्या नेतृत्वाखाली जमावाने सुरक्षा रक्षकांना त्या भागात पोहोचण्यापासून रोखले जेथे सशस्त्र गुंड स्वयंचलित बंदुकीने गोळीबार करत होते.

३ मेपासून मेइतेई आणि कुकी समुदायात झालेल्या जातीय हिंसाचारात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर ३ मे रोजी प्रथमच दोन्ही समाजात संघर्ष झाला होता. यानंतर लगेचच राज्यात जातीय हिंसाचार उसळला आणि हजारो घरांना आग लावण्यात आली. हिंसाचारामुळे लाखो लोक विस्थापित झाले असून शेजारच्या राज्यात पळून गेले आहेत.

News Title : Manipur Violence mob led by group of women attacked on security forces check details on 25 June 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Violence(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x