20 August 2022 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र
x

दिल्ली: जमावाने आयबी अधिकाऱ्याला मारून नाल्यात फेकलं होतं; मृतदेह सापडला

Delhi violence IB Police constable Amit Sharma, dead body found Chand Bagh Canal

नवी दिल्ली: दिल्लीच्या चंदबाग भागामध्ये मंगळवारी रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीत इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. नाल्यामध्ये या अधिकाऱ्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अंकित यांचे शव दंगलग्रस्त चांदबाग परिसरात आढळला. अंकित हे हरवले असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली होती. अंकित हे चांदबाद परिसरातील रहिवासी असून कदाचित त्यांचा दगडफेकीत मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. अंकित शर्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या पूर्वी दिल्ली पोलिसांनी आपले हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांना गमावले आहे.

नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात (CAA) मंगळवारी उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आगडोंब उसळला आहे. सोमवारी अनेक घरे, दुकाने आणि अनेक वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक व गोळ्या झाडण्यात आल्या. या हिंसक निदर्शनांमध्ये गोकुळपुरी भागात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला , तर शाहदराचे डीसीपी अमित शर्मा जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल रत्न लाल हे सहाय्यक उपायुक्त कार्यालयात कार्यरत होते. दरम्यान, डीसीपी शर्मा यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी डीसीपी यांची प्रकृती सुधारली. त्याचवेळी मृत पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन लाल (४२) हे एकटेच कुटुंबात पैसे कमावत होते. ते पत्नी आणि ३ मुलांसमवेत बुरारी येथे राहत होते.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाहीय असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 

News English Summery: Delhi violence toll rises to 6 A total of 3 bodies have been recovered from this morning. It also includes an IB spy staffer. The name of the employee is Ankit. Ankit’s body was found in the riot-hit Chandbagh area. His family had complained to police that Ankit was missing. Ankit, a resident of Chandabad area, may have been stabbed to death, police said. Ankit Sharma’s body has been sent for autopsy. Earlier, Delhi Police had lost its head constable Ratanlal.

 

Web Title: Story Delhi violence IB Police constable dead body found Chand Bagh Canal violent People assaulted police till.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x