2 May 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

शरीरावर औषधांची फवारणी केल्याने शरीरात प्रवेश केलेला व्हायरस नष्ट होत नाही

Human Sanitizing, Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, १९ एप्रिल: देशात करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढतच चालाल आहे. मागील २४ तासांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढली आहे. आतापर्यंत देशभरात रुग्णांची संख्या १५,७१२ इतका झाली आहे. तर, या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ५०७ इतकी झाली आहे. तसेच, या जीवघेण्या आजारातून आतापर्यंत २२३० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या देशभरात १२९७४ जणांवर उपचार सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरावर औषधं फवारणी करण्याबाबत खुलासा केला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेल्या सल्लामसलतमध्ये, जर कोणी व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर औषधांचा शिडकाव किंवा फवारणी केल्यावरही त्याच्या शरीरात प्रवेश केलेला व्हायरस नष्ट होत नाही. मंत्रालयाने असं म्हटलं आहे की, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत जे शरीराच्या बाह्य भागाला संसर्ग मुक्त करत असल्याचं सांगात.

मंत्रालयाने सांगितलं की, लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी किंवा संसर्गमुक्त करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड सारख्या औषधांच्या शिडकावच्या प्रभावाबाबत अनेक सवाल करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार, कोणत्याही व्यक्ती किंवा समूहावर अशा प्रकारच्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला कोणत्याही परिस्थितीत दिला जात नाही. कोणत्याही व्यक्तीवर किंवा समूहावर रासायनिक द्रव्यांची फवारणी केल्यास शारीरिक, मानसिक नुकसान होऊ शकते.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये रामपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सॅनिटायझेशनवरून वाद झाल्यावर काही लोकांनी तरुणाला जबरदस्तीने सॅनिटायझर पाजलं. त्यामुळे तरुणाची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The Union Health Ministry has disclosed spraying drugs on a person’s body to prevent coronary virus infection. Spraying the drug on people’s bodies to prevent the risk of infection can be physically and mentally harmful to the person and can pose a risk, the health ministry said.

News English Title: Story do not spray medicines on human body health ministry advised Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या