25 April 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कमलनाथ यांचा राजीनामा, काँग्रेसचं सरकार कोसळलं

Madhya Pradesh, CM Kamal Nath, News Latest Updates

भोपाळ, २० मार्च:  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, ‘आपण कोणत्याही खोट्या घोषणा केल्या नव्हत्या. भाजपाला १५ वर्ष मिळाले आणि मला १५ महिने मिळाले,’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं. ‘सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. “आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. भाजपाने कितीही अडथळे आणले तरी आम्हा विकासाच्या मार्गावर चालत राहणार. जनतेचा आमच्यावर विश्वास असून जनतेचं प्रमाणपत्र मिळेल. आम्हाला भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 

News English Summery:  Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath on Friday decided to resign his post. He gave this information to journalists. Kamal Nath said he would meet Governor Lalji Tandon and resign from him. This time, he strongly criticized the BJP. Kamal Nath accused the BJP of plotting and demolishing our government. Madhya Pradesh Assembly Speaker NP Prajapati has already accepted the resignation of 23 Congress MLAs. Kamal Nath has decided to resign his position before proving the majority in the Assembly. Speaking on the occasion, Kamal Nath said, ‘You have not made any false declaration. BJP got 15 years and I got 15 months, ‘he said. He accused the BJP of repeated attempts to destabilize the government. “There is no allegation of corruption in our government. No matter what obstacles the BJP may face, we will continue on the path of development. We believe in the masses and people will get their certificates. We do not need BJP certification, ”he added.

 

News English Title:  Story Kamal Nath resigns as Madhya Pradesh Chief Minister hours before trust vote deadline News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x